हिंडलगा ग्रामपंचायत हद्दीतील मराठा कॉलनी व लक्ष्मी नगर भागातील महिला व नागरिकांनी आज जिल्हाधिकारी आणि
जिल्हा पंचायत सीईओ यांना निवेदन देऊन विकासाच्या बाबतीत हिंडलगा ग्रामपंचायत ने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.
प्रामुख्याने महिलांनी निवेदन देऊन हा आरोप केला असून पायाभूत सुविधा द्या व विकास करा ही मागणी केली आहे.
या भागात पिण्याचे पाणि मिळत नाही, गटार नाही, रस्ते नाहीत तसेच कोणतीच विकास कामे केलेली नाहीत, हे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
हा भागएन ए असूनही दुर्लक्ष होत असून मूलभूत सुविधा नाहीत. सर्व्हे क्रमांक 213/1 व 213/2 मध्ये ही परिस्थिती आहे असे निवेदनात नमूद आहे.यावेळी एम एन शिरोळकर, बी एस नायक, मारुती पाटील, एन व्ही शिंत्रे, भाग्यश्री चव्हाण व इतर महिला उपस्थित होत्या.
बेळगाव तालुक्यातील शहरालगत मोठी चांगला महसूल मिळवणारी पंचायत म्हणून हिंडलगा ग्राम पंचायती कडे पाहिलं जातंय मात्र अश्या उपनगराकडे दुर्लक्ष केल्याने जनतेत नाराजी आहे.