पालकांनी विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे क्षेत्र निवडण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजेत आपली इच्छा त्यांनी आपल्या मुला मुलीवर लादू नये असे मत जी एस एस कॉलेजचे माजी प्राचार्य आनंद मेणसे यांनी मांडले.मराठा बँकेच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष एल एस होनगेकर होते.
दहावी आणि बारावी नंतर विद्यार्थ्यांकडे अशी अनेक क्षेत्रे आहेत त्यात विद्यार्थी आपले भविष्य घडवू शकतात.शिक्षणक्षेत्र कायदा विभाग आणि प्रसार माध्यमे या क्षेत्रात गुणवंत विद्यार्थ्यांनी प्रवे करून कर्तबगारीने नाव कमवावे असे आवाहन देखील मेणसे यांनी केलं.संचालक बाळाराम पाटील यांनी शिव प्रतिमा पूजन केले तर अध्यक्ष एल एस होनगेकर यांनी बँकेच्या कार्याचा आढावा घेतला.बँकेचे सरव्यवस्थापक रविकिरण धुरजी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
मेणसे यांनी विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास करावा याबाबत मार्गदर्शन करत समोर कोणकोणती क्षेत्रे उपलब्ध आहेत याची माहिती करून दिली.आजच्या घडीला विद्यार्थी आणि पालक यांच्यातील संवाद कमी झाला आहे तो वाढण्याची गरज व्यक्त करत विद्यार्थ्यांनी देशात बोकाळलेल्या जातीय वादापासून विद्यार्थ्यांनी अलिप्त रहावे असा सल्ला दिला.यावेळी कै माधवराव बागल पुरस्कार आनंद मेणसे यांना मिळाला आहे त्याबद्दल त्यांचा बॅंकेच्या वतीने सन्मान अध्यक्ष उपाध्यक्षानी केला.
यावेळी दहावी बारावीत 70%तर पदवी पदव्युत्तर परीक्षेत 65% गन मिळवून उत्तीर्ण झालेल्या 160 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी उपाध्यक्ष दिगंबर पवार,संचालक दीपक दळवी,अशोक भोसले,बी एस पाटील,सुनील अष्टेकर, शेखर हंडे,विनोद हंगीरगेकर,आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन मालोजी अष्टेकर यांनी तर बी एस पाटील यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी पालक भागधारक सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.