भारतीय लष्करी प्रशिक्षण विभाग म्हणजेच आर्मी ट्रेनिंग कमांड चे जनरल ऑफिसर आणि कमांडींग इन चीफ लेफ्टनंट जनरल पी सी थिंमय्या हे आज सोमवार दि 10 रोजी बेळगावला आले होते. या देशातील सर्वात महत्वाच्या पदावरील लष्करी अधिकाऱ्याची बेळगाव भेट महत्वाची ठरली. परम विशिष्ट सेवा मेडल आणि विशिष्ट सेवा मेडल चे मानकरी असलेल्या थिंमय्या यांनी बेळगावच्या लष्करी केंद्रातील ज्युनियर लिडर्स विंग ला भेट दिली.
लष्करात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या प्रतिष्टेच्या कमांडो आणि प्लाटून कमांडर्स या अभ्यासक्रमांचे कामकाज ज्युनियर लिडर्स विंग मध्ये चालते. विदेशी देशांचे जवान व लष्करी अधिकारी या अभ्यासक्रमात सहभागी होतात.
पॅरा मिलिटरी दलातील अनेक अधिकाऱ्यांचे प्रशिक्षणही येथेच होते. या साऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमाची भारतीय लष्करी प्रशिक्षण विभाग म्हणजेच आर्मी ट्रेनिंग कमांड चे जनरल ऑफिसर आणि कमांडींग इन चीफ लेफ्टनंट जनरल पी सी थिंमय्या यांनी माहिती घेतली.
कमांडर ज्युनियर लिडर्स विंग मेजर जनरल अलोक काकर यांनी स्वागत केले. यावेळी थिंमय्या यांनी प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. व भविष्यातील लष्करी अधिकारी घडवण्याचे उच्च प्रतीचे कामकाज पाहून गौरवोद्गार काढले.