ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक कलाकार गिरीश कर्नाड यांच्या निधनाने सोमवारी 10 जून रोजी राज्यातील सर्व शाळा कॉलेजना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या शिवाय राज्यात तीन दिवसाचा शासकीय दुखवटा देखील जाहीर करण्यात आला आहे.
कर्नाड यांचा अंतिम संस्कार शासकीय इतमामात केला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री एच डी कुमात स्वामी यांनी केली आहे. सोमवारी शाळांना सुट्टी द्यायचे की नाही त्या शाळा प्रशासनाने ठरवावे असेही कळवण्यात आले आहे
त्यांच्या निधनाने केवळ कर्नाटक किंवा कन्नड नव्हे तर महाराष्ट्राचे देखील नुकसान झाले आहे अशी श्रद्धांजली अशोक चंदरगी यांनी वाहिली आहे.
ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांना ट्विटरवरून श्रद्धांजली
गिरीश कर्नाड अभिनेता असण्यासोबतच लेखक, अॅवॉर्ड विनिंग नाटककार, दिग्दर्शकही होते. गिरीश कर्नाड यांच्या जाण्याने साहित्य तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील तारा निखळला असल्याची भावना अनेकांची आहे.
बॉलिवूडचे अभिनेते-दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांचे आज सकाळी बंगळुरूमधील राहत्या घरी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. ते ८१ वर्षांचे होते. ते अभिनेता असण्यासोबतच लेखक, अॅवॉर्ड विनिंग नाटककार, दिग्दर्शकही होते. गिरीश कर्नाड यांच्या जाण्याने साहित्य तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील तारा निखळला असल्याची भावना अनेकांची आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कर्नाड यांच्या निधनानंतर ट्विटवरून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. नाना पाटेकर यांनी तर व्रतस्थ रंगकर्मी हरपल्याची भावना व्यक्त केली आहे. मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेही ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सोनाली कुलकर्णीसाठी ते मेंटर तसेच गिरीश काका होते. तिनेही ट्विटरवरून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
गिरीश कर्नाड यांना त्यांच्या कार्यासाठी विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. सरकारने त्यांना पद्मश्री तसेच पद्मभूषण पुरस्काराने गौरविले आहे. त्यांना जनपीठ हा पुरस्कारही मिळाला आहे तसेच त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.