सायकल चालवून व्यायाम हे बऱ्याच जणांनी ऐकले आहे. मात्र सायकल चालवताना सायकलवरच व्यायाम किंवा योगासने ही संकल्पना तशी नवीनच. बेळगावच्या हर्षद कलघटगी यांनी ती शोधून काढली आहे .
सायकलिंग आणि त्याच वेळी योगा अशा पद्धतीने त्यांची योग साधना सुरू आहे. 42 वर्षीय हर्षद हे उद्योजक आहेत. त्यांनी एक ऑनलाईन व्हिडिओ पाहिला होता. त्याच्यात एक सायकलिस्ट सायकल चालवताना योगासने करत होता. त्यातून प्रेरणा घेऊन हर्षद यांनी स्वतःच्या आरोग्याच्या काळजी तून या नवीन संकल्पनेत प्रवेश केला. सुरुवातीला त्यांना चालत्या सायकलवर आसने करणे शक्य जात नव्हते. मात्र त्यांनी सराव करून यात सुधारणा करून घेतली आणि स्वतःला सायकल चालवतानाच योगासने करण्यात सक्षम बनवले .
आपल्या प्रत्येक उपक्रमात योग आहे. झोपताना ,श्वास घेताना, चालताना प्रत्येक गोष्टीत आपण योगा करत असतो. या सगळ्या उपक्रमांचा अभ्यास करून जर योगा केला तर त्याचा नक्कीच फायदा होतो .असे त्यांनी सांगितले. शिकताना आपल्याला कळले की योगासन समतोल साधण्यासाठी मदत करते.
शारीरिक मानसिक समतोल साधणे महत्वाचे असते. सायकलवर आपला तोल साधून योगा करण्याची कला त्यानी आत्मसात केली.
सायकलचे पायडल न मारता किंवा पाय न टेकता 49 मिनिटे आपला तोल सावरु शकतात. यामध्ये एकाग्रता महत्त्वाची आहे. अशी माहिती त्यांनी दिली. त्यांनी आपल्या तीन विद्यार्थ्यांना हे शास्त्र शिकवले असून त्यामध्ये त्यांची पत्नी तेजसा कलघटगी यांचाही समावेश आहे.