प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखालील भारतीय अ संघाने श्रीलंका अ संघाचा 48 धावांनी पराभव करत पहिल्या अनधिकृत एकदिवसीय सामन्यात पराभव एकदिवसीय मालिकेत देखील आघाडी मिळवली आहे.
भारतीय अ संघाने दोन्ही चार दिवसीय सामान्यात बाजी मारल्या नंतर एक दिवसीय सामन्यात देखील विजयी घोडदौड कायम राखली आहे.बेळगाव ऑटो नगर येथील के ए सी ए च्या स्टेडियम वर हा सामना खेळवला गेला.
श्रीलंका अ संघाने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण स्वीकारले.42 षटकांच्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 गडी बाद 317 धावा केल्या.भारताचा फलंदाज ऋतुराज गायकवाड याने 136 चेंडूत 187 धावा केल्या. ऋतुराजच्या नाबाद शतकाच्या जोरवर भारताला मोठी धावसंख्या उभारता आली.या धाव संख्येला प्रत्युत्तर देताना लंकन संघ 42 षटकात 6 गड्यांच्या मोबदल्यात 269 धावा केल्या.
भारता तर्फे मयंक मार्कंडे यानें 66 धावात मोबदल्यात2 गडी मिळवले. ऋतुराज डी गायकवाड याला सामनावीर पुरस्कार दिला गेला.पुढील वन डे मॅच बेळगावात 8 आणि 10 तारखेला खेळवला जाणार आहे.