धारवाड उच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत काही होऊ शकले नाही ही सुनावणी पुन्हा 14 जून वर गेली आहे. याचिकाकर्ते माजी उपमहापौर धनराज गवळी यांनी ही माहिती दिली आहे.
बेळगाव मनपाचे आरक्षण आणि वॉर्ड पुनर्रचना चुकीची असल्याची याचिका धनराज गवळी यांच्या नेतृत्वात काही माजी नगरसेवकांनी ही याचिका दाखल केली आहे.
निवडणूक आयोगाने आपली बाजू मांडली आहे आणि मनपाची बाजू अजून मांडायची असल्याने मनपा निवडणुकीचे भवितव्य निकलानंतरच ठरणार आहे.
- यापुढे 14 जूनला सुनावणी होणार असून त्यानंतर निवडणूक होऊ शकेल.