आधी उताऱ्यावर नावे, त्यानंतर बळजबरीने भूसंपादन, कामास बेकायदेशीरपणे सुरवात, आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना अटक हे सारे करून आता हलगा मच्छे बायपास मधील जागा गेलेल्या शेतकऱ्यांना नोटिसा देण्याचा कारभार प्रशासनाने सुरू केला आहे.
आज सोमवारी शेतकऱ्यांना भु संपादन नोटीस देण्यात येत आहे. वरातीमागून घोडे नाचवण्याचा हा कारभार संतापाचा ठरला असून शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झालेली नसताना जबरदस्तीने जागा ताब्यात घेऊन आणि शेतकऱ्यांवर बळजबरी करून आपल्या गैर कारभाराचे दर्शन घडवणाऱ्या प्रशासनाने आता नोटीस दिल्याने हा दुर्दैवी कारभार समोर आला असून त्याबद्दल विरोध होऊ लागला आहे.
हलगा मच्छे बायपास मध्ये तीन बार पिके घेणारी सुपीक जमीन बळकावण्यात आलो आहे शेतकरी विरोध करत असताना पोलिसांनी प्रशासनाने दंडुके शाहीचा वापर करत जमीन संपादन केली आहे. या सर्व प्रक्रियेत जमीन संपादन होऊन रस्ता झाल्यावर प्रशासनाने नोटीशी दिल्या आहेत या सर्व प्रकाराने सीमा भागातला शेतकरी सध्या भीतीच्या छायेखाली अडकला आहे कधी कुठली जमीन संपादन केली जाईल याचा नेम नसल्याने शेतकरी चिंतातुर आहे.