बेळगाव शहरात पत्रकारितेत 50 वर्षे पूर्ण आणि आपल्या आयुष्याची सत्तर वर्षे पूर्ण केलेल्या जेष्ठ पत्रकाराचा सत्कार पत्रकार विकास अकादमी च्या वतीने करण्यात आला.
दैनिक तरुण भारतचे संपादक जयवंत मंत्री यांचा 70 वा वाढदिवसानिमित्त पत्रकार विकास अकादमीचे जेष्ठ पत्रकार प्रशांत बर्डे,नेताजी जाधव आणि माजी महापौर विजय मोरे यांनी त्यांचा श्रीफळ शाल गुच्छ देऊन सत्कार केला.जयवंत मंत्री यांनी पत्रकारिता क्षेत्रात 50 वर्षे पूर्ण केली आहे त्या बद्दल नेताजी जाधव विजय मोरे आणि प्रशांत बर्डे यांनी त्यांचे कौतुक केले.
नेहमी पत्रकार आपापल्या कामात व्यस्त असतात ते भेटत नसतात मात्र वाढ दिवसा निमित्त बेळगावतले दोन दिग्गज पत्रकार एकत्र आले होते.जेष्ठ पत्रकार प्रशांत बर्डे आणि जयवंत मंत्री एकत्र आले होते त्यांचे मित्र माजी नगरसेवक नेताजी जाधव उपस्थित होते. यावेळी पत्रकार विकास अकादमीचे सचिव प्रसाद प्रभू यांनी स्वागत केले विजय मोरे आणि नेताजी जाधव यांनी मंत्री यांच्या कार्याचा आढावा घेत पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी पत्रकार रमेश हिरेमठ,मनीषा सुभेदार, प्रकाश बेळगोजी, गंगाधर पाटील सुशांत कुरंगी जगदीश दड्डीकर सुनील कामत तसेच त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.