Saturday, November 16, 2024

/

बार असोसिएशन निवडणुकीवर गोंधळाचे सावट

 belgaum

बेळगाव बार असोसिएनच्या निवडणुकीत वकिलांनी दाखल केलेल्या एकूण अर्जा पैकी छाननीतमोठ्या प्रमाणात अर्ज अवैध ठरले आहेत.या छाननी प्रक्रियेत एकूण 20 अर्ज अवैध ठरवले त्यामुळे नाराज काही वकिलांनी निवडणूक कार्यालयात गोंधळ घातला होता.

शुक्रवारी उशीर पर्यंत बराच काळ हा गोंधळ सुरू होता. निवडणूक उमेदवारी अर्ज व्यवस्थित रित्या भरून देखील मुद्दाम अर्ज अवैध ठरवण्यात आलेत असा आरोप करत काही वकिलांनी तक्रार दाखल केली आहे .शनिवार हा अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असून याबाबत उद्याच चित्र स्पष्ट होणार आहे.अर्ज अवैध ठरवलेल्या प्रक्रिये विरोधात काही वकील न्यायालयात जाण्याची शक्यता आहे त्यामुळे या बार असोसिएशनच्या निवडणुकीवर गोंधळाचे सावट निर्माण झाले आहे.

advocate logo

छाननीत अध्यक्ष पदासाठी तीन जणांचे अर्ज वैध तर चार जनांचे अवैध ठरवण्यात आले आहेत.उपाध्यक्ष पदांच्या दोन जागकरिता 5 अर्ज अवैध तर दोन अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत.निवडणूक अधिकारी एल के गुरव यांच्या नेतृत्वाखाली अर्ज छाननी प्रक्रिया पार पडली.

अध्यक्ष पदाच्या एक जागेसाठी विध्यमान अध्यक्ष एस एस किवडसण्णावर, ए जी मूळवाडमठ दिनेश पाटील यांचा अर्ज वैध तर धनराज गवळी,सुनील सानिकोप, महेश कुलकर्णी आणि ए एम पाटील यांचे अध्यक्ष पदासाठीचे अर्ज रिजेक्ट करण्यात आले आहेत.

उपाध्यक्ष पदांच्या दोन जागांसाठी वकील सुधीर चव्हाण आणि विठ्ठल कामते यांचे अर्ज रिजेक्ट तर सचिन शिवांनावर सी टी मजगी गजानन पाटील लक्ष्मण पाटील आणि जे एस मंदरोळी यांचे अर्ज वैध ठरले आहेत.22 जून रोजी बेळगाव बार असोसिएशन साठी मतदान होणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.