बेळगाव शहर आणि परिसरात पहाटेपासून सोसाट्याचा वारा आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. झाल्याने गटारी तुंबल्या आहेत.किल्ला फोर्ट रोड वरील जिजामाता चौकात छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुलाच्या पायथ्याशी सांडपाणी रस्त्यावर आल्याने ये जा करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
गुरुवारी पहाटे शहरात वातावरणात बदल झाला अन सोसाट्याच्या वाऱ्या सह पाऊल कोसळला हवेत काही प्रमाणात गारठा निर्माण झाला होता.मान्सूनने केरळ मध्ये दस्तक दिल्याचा बातम्या कानावर पडत असताना बेळगावातले देखील वातावरण बदलू लागले आहे.
पहाटे झालेल्या पावसाने गटारी तुंबल्या असून सांडपाणी रस्त्यावर आले आहे परिणामी ये जा करणाऱ्याना याचा त्रास होत आहे.याला पूर्णपणे महा पालिकेचा आरोग्य विभाग आणि पर्यावरण विभाग जबाबदार आहे असा आरोप केला जात आहे कारण प्लास्टिक बंदीची अमल बजावणी केवळ कागदावर असून अधिकारी चिरीमिरी घेऊन अमल बजावणी करत नाहीत त्यामुळे रस्त्यावरचे प्लास्टिक गटारीत गेल्यानेच गटारी तुंबल्या आहेत थोडाच पाऊस झाल्याने सांडपाणी रस्त्यावर आले आहे असा आरोप माजी नगरसेवकाने केला आहे .हा भाग जरी कॅटोंमेंट भागात येत असला तरी शहरातील प्लास्टिक एकत्र येऊन गटारी तुंबल्या आहेत.
कालच पर्यावरण दिन साजरा झाला आहे प्लास्टिक मुळे गटारी तुंबल्या त्यातच ही अवस्था.. अश्या स्थितीत बेळगाव शहर पर्यावरण मुक्त आणि स्मार्ट कसे होणार?