कारवारचे बिशप असलेले डेरेक फर्नांडिस यांनी बुधवारी बेळगाव डायोसिस चे बिशप पदी सूत्रे स्वीकारली आहेत. कॅम्प बेळगाव येथील फातिमा कॅथेड्रल येथे झालेल्या समारंभात त्यांनी सूत्रे स्वीकारली.
रोम धर्म मुख्यालयाचे दिल्ली येथील सदस्य झेवीयर नूनसीओ यांनी अधिकार पदाचे पत्र सोपवले. आर्चबिशप पीटर मचाडो यांनी सूत्रे बहाल केली.
गोवा चे आर्चबिशप फिलिप नेरी फेराव, कॅथलिक बिशप काँफेरेन्स इंडिया चे अध्यक्ष , 400 हुन अधिक धर्मगुरू, 11 बिशप आणि ख्रिश्चन समुदाय उपस्थित होते.
डीसीपी सीमा लाटकर, के एल ई विद्यापीठाचे कुलगुरू विवेक सावजी, अंगडी शिक्षण संस्थेचे प्रमुख डॉ संजय पुजारी व इतर प्रथितयश नागरिक उपस्थित होते.