मन्नूर गावात प्राथमिक शाळेत वाढीव हायस्कुल सुरू करा या मागणीसाठी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी शिक्षणाधिकारी कार्यालया समोर आंदोलन छेडले होते.
या गावात केवळ 8 वी पर्यंत शाळा असून लवकर 9 वी आणि 10 वी चा वर्ग सुरू करण्याची गरज आहे याबाबत अनेकदा शिक्षण खात्याला निवेदन देऊन देखील याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.कित्येक वेळा शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देऊन देखील त्यांनी सरकारला ही बाब कळवली नसल्याचा आरोप करत कार्यालयात आंदोलन केलं.
पुन्हा शिक्षणाधिकारी धारेवर
निवेदन देऊन सुद्धा याची दखल घेतला नाही असा आरोप करताच अधिकारी पुंडलिक यांनी सरकारला मेल द्वारे कळवलं आहे असे स्पष्ट केले त्यावेळी संतप्त ग्रामस्थांनी पुंडलिक यांना चांगलेच धारेवर धरले.