पूर्ण जिल्ह्याच्या समस्या निवारण्यासाठी असणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयात कचरा साचला आहे. काही कर्मचाऱ्यांनी हा कचरा केल्याचे निदर्शनास येत आहे, त्यामुळे जर जिल्हाधिकारी कार्यालयातच कचरा असेल तर शहराची काय परिस्थिती असणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर विविध कक्ष स्थापण्यात आले आहेत. त्यामध्ये काही कक्ष खाली आहेत. तर काही उतारा व इतर कागदपत्रे काढून देण्यासाठी सुरू आहेत. याच कक्षात वरच्या बाजूला कचरा टाकण्यात आला आहे. हा कचरा काढण्याकडे साफ दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वरच्या एका कक्षात चहाचे कप व इतर साहित्य टाकून देण्यात आले आहेत. त्यामुळे त्या कक्षाला कचरा कुंडाचे स्वरूप आले आहे. हा कचरा काढण्यासाठी कोणाचेच लक्ष नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील अनेक दिवसापासून हा कचरा तिथेच पडून आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातच अशी अवस्था झाली तर इतर कार्यालयांचे काय हा प्रश्न गंभीर बनत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर विविध कक्ष स्थापण्यात आले आहेत. मात्र त्यातील केवळ मोजकेच कक्ष सुरू असल्याने इतर कक्षामध्ये कचऱ्याचा ढीग साचून आहे. हा कचरा येथील अधिकाऱ्यांनीच टाकल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे जर अधिकारीच कचरा करत असतील तर सर्वसामान्यांचे काय हा प्रश्न विचार करणारा आहे.