बेनकनहळ्ळी ते सावगावला जोडणाऱ्या रस्त्याची परिस्थिती पहा ,खालील छायाचित्रात तुम्हाला दिसेल, त्या रस्त्यावर पडलेले खड्डे आणि रस्ता नाहीच तर नुसती मातीच ही परिस्थिती. आत्ताच अशी परिस्थिती आहे तर पावसाळ्यात नेमकी परिस्थिती काय होईल याचा अंदाज न केलेलाच बरा..
या परिसरातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होऊ लागले आहे. या रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांची सध्या अवस्था वाईट आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर मातीची व चिखलाची दलदल होणार असून लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष त्याला कारणीभूत ठरले आहे .
बेळगाव ग्रामीणच्या आमदारांनी निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने विसरली आहेत असा आरोप या भागातील नागरिक करत आहेत. या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांना सुधारण्याची गरज होती. रस्ता नव्याने तयार करण्याची गरज आहे. मात्र बेळगाव ग्रामीण भागातील रस्ता पूर्णपणे उखडून गेला आहे. लवकरात लवकर रस्ता होण्याची गरज आहे. पण विकासाकडे दुर्लक्ष झाले असून त्यामुळे या पावसाळ्यात काय होईल याची कल्पना न केलेली बरी अशी अवस्था निर्माण झाली आहे .
दुर्लक्ष केलेल्या लोकप्रतिनिधींनी याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन रस्ता करायची गरज होती, आता पावसाळा तोंडावर आला असल्यामुळे आता रस्ता करणे अवघड असून किमान तात्पुरती काहीतरी व्यवस्था करण्याची गरज आहे.