Friday, December 20, 2024

/

मनपा नसेना बार्क आले मदतीला

 belgaum

बेळगाव महानगरपालिकेला मोकाट कुत्र्यांचा प्रश्न सोडवता आला नाही ,त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा त्रास अनेक दशकांपासून बेळगाव शहरवासीयांना भोगावा लागत आहे. मोकाट कुत्र्यांचे हल्ले आणि रस्त्यातील धावाधाव आणि त्यातून होणारे अपघात यासारख्या समस्यांना बेळगाव शहरवासीय तोंड देत आले आहेत. मात्र महानगरपालिकेने काही केले नाही आता एक प्राणीप्रेमी संघटना पुढे आली असून बार्क या नावे स्थापन झालेल्या या संघटनेने मोकाट कुत्र्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी पावले उचलली आहेत .

बेलगाम ॲनिमल रेस्क्यू अँड केअर या नावाने ही संघटना स्थापन झाली असून धोकादायक मोकाट कुत्र्यांवर कायमस्वरूपी उपाय असल्याचा दावा या संघटनेने केला आहे. योग्य पद्धतीने मोकाट कुत्र्यांचा प्रश्न सोडवता येतो .त्यासाठी जबाबदारी घेतली असल्याची माहिती या संघटनेचे अध्यक्ष सूर्या बी कुलकर्णी यांनी दिली आहे. लसीकरण व त्यांची योग्य काळजी आणि त्यांना दत्तक घेऊन शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न सोडवत आहोत असे सांगितले.

मागील काही महिन्यांपासून शहरी भागात हे काम सुरू आहे ,असे ते म्हणाले. बार्क च्या संचालक सुचेता इनामदार यांनी सांगितले की या संघटनेचे सदस्य सामाजिक कल्याण उपक्रम करण्यात आघाडीवर आहेत ,मोकाट कुत्र्यांना औषधे पुरवणे जखमी जनावरांवर मलमपट्टी करणे आणि त्यांना दत्तक घेऊन स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून त्यांची देखभाल केली जात आहे, आणखी एक संचालक वरून कारखानीस यांनी समाजामध्ये मोकाट कुत्र्यांचा बद्दलचा नकारात्मक दृष्टिकोन बदलण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे सांगितले, या उपक्रमासाठी बेळगाव महानगरपालिकेने पाच गुंठे जमीन आपल्याला द्यावी अशी मागणी या संघटनेने केली आहे.

ज्या ठिकाणी आजारी व जखमी मोकाट कुत्र्यांच्या उपचारासाठी मदत करता येईल .तसेच त्यांच्यावर लसीकरण व इतर काळजी करता येईल असे संघटनेचे म्हणणे आहे. सध्याचे काम मर्यादित क्षेत्रात सुरू असून महानगरपालिकेने जागा पुरवल्यास मदत होईल असा प्रस्ताव संघटनेने दिला आहे. मोकाट कुत्र्यांवर योग्य उपाय अमलात आणण्यास अपयशी ठरलेल्या महानगरपालिकेने किमान या काम करणार्‍या माणसांना जागा देऊन शहरांच्या डोकेदुखी तर मुक्तता करावी अशी मागणी आहे.अधिक माहिती व मदतीसाठी बार्क च्या 9739867050 या क्रमांकावर संपर्क करू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.