बेळगाव येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या माजी सीईओ दिव्या होसुर शिवराम यांना आज जनतेचे, बोर्ड कर्मचारी व सदस्यांचे आपल्यावरील प्रेम पाहून डोळ्यातील अश्रू आवरता आले नाहीत. त्या भारावून गेल्या होत्या.
दिव्या मॅडमची डेप्युटेशनवर दिल्ली येथे बदली झाली. त्या एक दोन आठवडे आपल्या नवीन पदावर हजर होण्यासाठी गेल्या होत्या. आज कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कर्मचारी आणि सर्व सदस्यांनी त्यांना निरोप देण्याचा सोहळा केला. शुभेच्छांचा पाऊस आणि त्यामध्ये आपल्यातून एक कर्तव्यदक्ष अधिकारी निघून जात आहेत याचा ओलावा दिसल्याने दिव्या मॅडमच्या डोळ्यातून आसवे वाहू लागली. आपल्या पत्नीने बेळगावमध्ये कमावलेले नाव पाहून त्यांचे पती व सनदी अधिकारी असलेले श्री होसुर यांनाही अभिमान वाटला त्यांनी तसे बोलून दाखवले.
दिव्या मॅडम वर बुके आणि शुभेच्छांच्या फुलांचा वर्षावच ऑफिस स्टाफ व कॅन्टोन्मेंट बोर्ड सदस्यांतर्फे सत्कार करून करण्यात आला. सजवलेल्या
गाडीवर बसवून सदस्य साजिद शेख यांनी दिव्या मॅडम यांची निरोपाची मिरवणूक काढली. हा एक सुखद धक्काच होता. सर्व
स्टाफ, कर्मचारी, स्कुल चे शिक्षण व इतर सर्वांनी कॅन्टोन्मेंट ऑफिस पासून सीईओ बंगल्या पर्यंत झालेल्या या निरोपाच्या मिरवणुकीत सहभाग घेतला होता. दिव्या मॅडम नी हात जोडून या प्रेमाबद्दल आभार मानले.
कॅन्टोन्मेंट शाळांमध्ये सुधारणा, साऊथ टेलिग्राफ रोड आणि पोस्ट ऑफिस रोड चे सौन्दर्यीकरण, बोर्डातील नागरिकांना स्मार्ट बनवणारे डिजिटल पोर्टल बनवून काम केलेल्या या महिला अधिकारीला आपल्या कामाची पोचपावतीच मिळाली.
यापूर्वी 1982 मध्ये असा सत्कार झाला होता .37 वर्षांपूर्वी जैनोद्दीन नावचे सीईओ होते. त्यांची बदली झाल्यावर त्यांचा सत्कार करून अशी निरोपाची मिरवणूक काढण्यात आली होती साजिद शेख यांच्या वडिलांनीच अशी मिरवणूक काढली होती. आज त्या मिरवणुकीचेही स्मरण झाले अशी माहिती कॅम्प भागातील नागरिकांनी दिली.