गरीब लोकांवर वार आणि मोकळी जागा सोडून एजंटांना खुला प्यार देण्याचा प्रकार बेळगावच्या डिसी ऑफिस आवारात पाहायला मिळत आहे. जेथे गोरगरीब लोक कँटीन लावून चार पैसे कमवत होते आणि ज्या ठिकाणी गरिबांच्या पोटापाण्याची कमी खर्चात सोय होत होती ती जागा गरिबांवर वार करून खुली करण्यात आली. आता तेथे गच्च पार्किंग होत असून एजंट लोकांना आपल्या कार लावून आपले व्यवसाय करण्यास मोकळे आंधण देण्यात आले आहे.
ही डिसी ऑफिस ची जागा, येथे पूर्वी कँटीन होते. याठिकाणी कामाला येणारे लोक या कँटीन मधून मिळणारे अन्न खाऊन जगत होते. पण हे काहींना बघवले नाही. या जागेवर पाच मजली इमारत बांधण्याचा प्रस्ताव होता यासाठी कँटीन चालकांना हटवण्यात आले. त्यांचे पोट बंद करून त्यांच्यावर आधारित लोकांचेही पोट बंद करण्यात आले आहे.
आता ही जागा कार मध्ये चाललेल्या रियल इस्टेट चा अड्डा बनला आहे. कोर्टातील सर्व अंडरग्राऊंड व्यवहारसुद्धा या जागेवर बंद कारमध्ये सुरू झाले आहेत. ही जागा खाली करण्याचा हाच उद्देश होता की काय? हा प्रश्न पडत असून जिल्हा प्रशासन गरिबांचे वाली की त्या एजंट लोकांचे? हेच कळेना झाले आहे.