Tuesday, June 25, 2024

/

युवा समितीकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप सुरू

 belgaum

*महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक साहित्य वाटपाचा शुभारंभ* बुधवार दिनांक 26 जून पासून *कॅन्टोनमेंट मराठी प्राथमिक शाळा,* कॅम्प बेळगाव. येथे पहिलीच्या विध्यार्थ्यांना साहित्य वाटपातून करण्यात आला.
मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि मराठी भाषा आणि संस्कृती वाढावी यासाठी गतवर्षी पासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

तसेच आज राजर्षी शाहू महाराज यांची जयंती असल्याने प्रथम त्यांसी प्रतिमा पूजन, पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, आणि कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.कॅन्टोनमेंट मराठी शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत बिर्जे यांनी युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत वह्या वाटप करून केले.

याप्रसंगी सरांनी आपल्या शाळेत राबविण्यात येणारे विवीध उपक्रम आणि शैक्षणिक गुणवत्ता याची माहिती दिली. तसेच या उपक्रमातून 2016 साली 100 च्या घरात असणारी शाळेची पटसंख्या आज 300 च्या घरात गेली आहे याचीही माहिती दिली.
यावेळी युवा समिती मार्फत 58 पहिलीच्या विध्यार्थ्यांना वस्तू वाटप करण्यात आल्या.शाळा नंबर 7शाळा नंबर 12 शाळा नंबर 3 येथेही वाटप संपन्न झाले.

 belgaum

सदर उपक्रमाला युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, उपाध्यक्ष संतोष कृष्णाचे, सरचिटणीस श्रीकांत कदम, ग्रामीण संघटक विशाल गौंडाडकर, वैभव गौंडाडकर, युवराज मलकाचे, विजय जाधव, अनिल गवळी, उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.