बेळगावचे उर्दू पत्रकार साहित्यिक समद खानापुरी यांच्या पुस्तकाला कर्नाटक उर्दू साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
खानापुरी यांच्या’बेलगाम तारीख के आईने मे’या बेळगाव शहराचा इतिहासाचा उलगडा करणाऱ्या पुस्तकात कर्नाटक उर्दू अकादमीने साहित्य अकादमीचा पुरस्कार,रोख 25 हजार देऊन बंगळुरू येथे गौरव केला जाणार आहे.आगामी 2 जुलै रोजी बंगळुरू टाऊन हॉल मध्ये विशेष कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.
बेळगावच्या उर्दू साहित्य क्षेत्रात समद खानापुरी यांना अकादमीचा पुरस्कार मिळणे ही अभिमानाची बाब आहे.त्यांची उर्दूत सहा पुस्तके प्रकाशित झाली असून सातवे पुस्तक ‘कर्नाटक के रोशन सितारे’ हे प्रकाशनाच्या मार्गावर आहे या पुस्तकात ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचे विश्लेषण आहे.
समद खानापुरी हे बशीबान उर्दू शाळेचे शिक्षक होते त्यांचे सुरुवातीचे शिक्षण मराठी भाषेत झाले असून बेळगावात उर्दू साठी बरेच काम केले आहे. ‘बेलगाम तारीख के आईने मे’या अकादमीचा पुरस्कार प्राप्त पुस्तकात बेळगाव शहराचा इतिहासाचे वर्णन त्यांनी अनेक पुरावे देत केलेला आहे या पुस्तकाचा हिंदी अनुवाद देखील लवकरच प्रसिद्ध केला जाणार आहे.