के एल ई इंटरनॅशनल स्कुलची काही मुले सध्या जर्मनीत आहेत. या शाळेच्या विदेश अभ्यास मोहिमेतून दहावी आणि अकरावीत शिकणाऱ्या एकूण दहा मुलांना जर्मनीला पाठवण्यात आले आहे.
आरुष दोडवाड, सुजल सावंत, माहिका मिर्जी, लक्ष्मी कुरणवाडे, धीरेन कामनगौडर, दर्शन सावन्त, शशांक देशपांडे, चिराग रेवणकर, आर्यन पूनेद व निहाल गमगनहटी हे ते विद्यार्थी असून अश्विनी पाटील व सीमा जालगार या शिक्षिका त्यांच्या सोबत आहेत.
ब्रेमेन जर्मनी येथील ruebekamp शाळे सोबत झालेल्या समन्वय करारांतर्गत हे विद्यार्थी अभ्यास दौरा करणार आहेत.
बेळगावच्या या मुलांची ही झेप शाळेच्या प्रोत्साहन व पुढाकारातून झाली असून त्यांचे अभिनंदन होत आहे.