योगा हा मन आणि शरीराचा व्यायाम आहे. मागील पाच हजार वर्षाचा इतिहास या शास्त्राला लाभला आहे. हे शास्त्र भारताने तयार केले मात्र त्याचा जास्तीत जास्त उपयोग विदेशात होतो. हे मत आहे योगगुरू नईम शेख यांचे. जागृतीचा अभाव हेच प्रमुख कारण आहे असे ते म्हणतात.
नईम शेख मागील बारा वर्षापासून या क्षेत्रात काम करत आहेत. योगा संदर्भात जागृती करत आहेत ,योग केल्याने होणारे फायदे शाळांमध्ये तसेच महाविद्यालयांमध्ये जाऊन सांगत आहेत .वेगळ्या प्रकारच्या योगासनांची माहिती देत आहेत. त्याचबरोबर अनेकांना योग शिकवत आहेत.
प्रत्येकाने नियमित योगा करणे आरोग्यवर्धक राहण्यासाठीची गरज आहे. असे त्यांनी सांगितले. आरोग्याच्या तक्रारी असतील तर डॉक्टर बरोबरच योग तज्ज्ञांकडून सल्ला जाणून घ्या, त्यामुळे फायदा होऊ शकतो. गरोदर स्त्रिया सुद्धा योगा करू शकतात असे त्यांनी सांगितले.
जपान आणि चीन सारख्या देशात शारीरिक शिक्षणावर अधिक भर आहे . आपला देश यात मागे आहे.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगा संदर्भात जागृती करण्याचा जो प्रयत्न केला तो खरंच महत्त्वाचं असून आजवर फक्त सरकारी कार्यालय शाळा आणि इतर संस्थांमध्ये योगाला फक्त एकच दिवस महत्त्व आहे. हे महत्त्व नियमित स्वरूपात आले पाहिजे .जागृतीचा अभाव त्याला प्रमुख जबाबदार आहे. असे मत त्यांनी मांडले.