सांबरा विमानतळावरून उद्या गुरुवार दि 20 पासून मुंबई विमानसेवा सुरू होणार आहे. या फेरी बरोबरस्पाईस जेट कंपनीकडून दिल्ली, मंगळूर, चेन्नई, सुरत, जबलपूर,सुरत, कोझिकोड आदी शहरांना कनेक्टिंग विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. कनेक्टिंग विमानसेवेमुळे
अवघ्या 4 ते 6 तासात हि शहरे गाठणे शक्य होणार आहे.
स्पाईस जेट बेळगाव- मुंबई विमानसेवा दि 20 जूनपासून सुरू करणार आहे. बंगळूर-बेळगाव-मुंबई आणि परतीचा पुन्हा मुंबई-बेळगाव-बंगळूर असा मार्ग राहणार आहे. त्याच बरोबर उद्यापासून पासून स्पाईसजेटची बेळगाव- बंगळूर मार्गावर रोज दोन विमाने ये-जा करणार आहेत. या फेऱ्या सुरू झाल्यानंतर देशातील महत्त्वाच्या शहरांना कनेक्टिंग विमानसेवा देणे शक्य होणार आहे.
बेळगावहुन अवघ्या 4 तासात व्हाया मुंबई जबलपूर गाठणे शक्य होणार आहे. सायंकाळी बंगळूरकडे उड्डाण करणारे विमान पुढे मंगळूरला जाणार असल्याने अवघ्या 4 तासात मंगळूरचा प्रवास शक्य आहे.
राजधानी दिल्ली गाठणे अवघ्या 6 तासात शक्य होणार आहे. मुंबईमार्गे हा प्रवास उपलब्ध आहे. बंगळूर आणि हैदराबाद मार्गेही 8 ते 9 तासात जाणे शक्य आहे. सद्या चेन्नईला थेट फेरी नाही मात्र बंगळूर आणि हैदराबाद मार्गे 5 ते 5 तासात चेन्नई गाठता येते. केरळच्या कोझिकोडला व्हाया बंगळूर 4 तासात सेवा उपलब्ध आहे.
व्यापाऱ्यांच्या दृष्टीने महत्वपूर्ण असणाऱ्या सुरातला मुंबईमार्गे 5 तासात पोचणे शक्य आहे. मध्यप्रदेशाची राजधानी भोपाळ शहारालाही हैदराबादमार्गे अवघ्या 5 तासात कनेक्टिंग फेरी उपलब्ध आहे. कोलकत्त 10 तासात तर जयपूर, विजयवाडा 12 तासात गाठता येणे शक्य आहे. ग्वाल्हेर, पटना, बागडोगरा, विशाखापट्टण या शहरांना 14 तासात पोचणे शक्य होणार आहे