बार असोसिएशन च्या निवडणूक प्रक्रियेत मोठ्या संख्येवर अर्ज अवैध ठरवल्याने नाराज झालेल्या वकिलांनी घातलेल्या गोंधळा नंतर पुन्हा सोमवारी झालेल्या बैठकीत नवीन वेळा पत्रक जाहीर करण्याचा निर्णय झाला आहे.बार असोसिएशनच्या समुदाय भवनात अध्यक्ष एस एस किवडसांनावर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
यात अंतिम मतदारयादी तयार होईपर्यंत बार असोशिएशन निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेला राजीनामा स्वीकारण्यात आला आहे.संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच रद्द करून जनरल बॉडीने ती पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक अधिकारी एल के गुरव यांनी दिलेला राजीनामाही जनरल बॉडी समोर ठेऊन मंजूर करण्यात आला आहे.
मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवारांचे अर्ज रिजेक्ट झाल्याने गोंधळ झाला होता त्यामुळे निवडणूक पुढे ढकलली असून नवीन वेळा पत्रका जाहीर करून नवीन निवडणूक अधिकाऱ्याची नियुक्ती करून निवडणूक घेतली जाणार आहे यासाठी आणखी एक सर्व समावेशक बैठक घेतली जाणार आहे.
नूतन निवडणूक अधिकाऱ्याची नेमणूक करून मतदार यादीतील चुकांची दुरुस्ती करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. कुणाचे आक्षेप असतील तर ते नोंदवून घेऊन मतदार यादीत सुधारणा करण्यात येणार आहे.
समुदाय भवन येथे अध्यक्ष किवडसन्नावर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली असून सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुकीचे नवीन वेळापत्रक जाहीर होणार आहे.