बेकिनकेरे येथील उद्योग खात्री संदर्भात घेण्यात आलेली ग्रामसभा काही राजकारण्यांमुळे रद्द झाली आहे. कोणतीही सभा होऊ न देण्याची अट घालण्यात धन्यता मानणाऱ्या राजकारण्यांनी यावेळीही बेकिनकेरे ग्रामसभा रद्द केल्याची घटना घडली. या ग्रामसभेला मोजकेच अधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
उद्योग खात्री कामासंदर्भात बेकिनकेरे ग्रामपंचायतीमध्ये उद्योग खात्री ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेत उद्योग खात्री संदर्भातील विषय सोडून नको ते विषय काढण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. काही राजकारण्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी यामध्ये गोंधळ घातल्याचेही निदर्शनास आले आहे.
बेकिनकेरे ग्रामपंचायतीमध्ये उद्योग खात्रीतून एकही दिवस काम देण्यात आले नाही. अशी ओरड सुरू होती. मात्र नुकत्याच घेण्यात आलेल्या तालुका पंचायत बैठकीमध्ये त्यांना बाहेरगावी काम देण्यात आले होते. मात्र त्यांनी ते केले नाही. हा विषय उद्योग खात्रीतून घेण्यात आलेल्या ग्रामसभेत झाला. आम्हाला गावातच कामे हवी आहे अशी मागणी करण्यात आली. मात्र या वेळी काही राजकारण्यांनी याला काहींनी ग्रामसभेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.
उद्योग खात्री योजनेअंतर्गत गावात विविध कामे राबवण्यात आले आहेत. त्यामुळे पीडीओ आणि क्लार्कने याबाबत नागरिकांना माहिती दिली. येत्या वर्षी लवकरात लवकर तुम्हाला काम उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही दिली. मात्र काही राजकारणीनी याला आक्षेप घेत स्वतःच्या फायद्यासाठी ग्रामसभेत गोंधळ घातल्याची घटना घडली आहे. त्यामुळे ही ग्रामसभा रद्द करण्यात आली असून लवकरच ही ग्रामसभा घेण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.