Tuesday, December 24, 2024

/

पुन्हा सुवर्ण सौधवर धडकलेल्याना अटक

 belgaum

शेतकऱ्यांची अनूमती नसताना तीबार पीकी सूपीक जमीनीतून केंद्र व राज्य शासनाने विकासाच्या नावे पोलिसी दंडेलशाहीच्या जोरावर हालगा-मच्छे बायपास तसेच हालगा सांडपाणी प्रकल्प राबवत आहे. त्याला विरोध सूरुच आहे. सोमवारीही शेतकरी या विरोधात सुवर्णसौध वर धडकले. धरणे, निदर्शने आणि रास्तारोको करणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच नेत्यांना अटक करण्यात आली. कितीही वेळा अटक करा आम्ही आंदोलन करीत राहणार असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

सोमवारच्या कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या सूवर्णसौधसमोरील धरणे आंदोलनात रयत गल्लीतील शेतकरी,महिलासह मूलं तसेच संपूर्ण वडगाव,शहापूर भागातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सामाजिक कार्यकर्ते सुजित मूळगुंद, जि पं सदस्य माधुरी हेगडे व राजू मरवे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांना बळजबरीने पोलीस गाडीत कोंबून नेण्यात आले.

Farmer protest
सोमवार दि १० रोजी सकाळी १०.३० वाजता कर्नाटक राज्य रयत संघटनेनेसूध्दा येथील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सूवर्णसौधसमोर धरणे आंदोलन आयोजित केले होते.
केंद्र, राज्य शासनाला सूपीक जमीन भूमीअधिग्रण कायदा रद्द करुन शेतकरी वाचवा तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या इतर मागण्या मान्य पूर्ण कराव्यात यासाठी देखील हे धरणे आंदोलन झाले.

बेळगाव शहर परिसरातील शेतकरी बंधू,सामाजिक संघटनानीही या आंदोलनात हिरिरिने भाग घेऊन आंदोलन यशस्वी करण्यात मदत केली आहे.सुजित मूळगुंद यांच्या सह रयत गल्ली शेतकरी समीती अध्यक्ष राजू मरवे,उपाध्यक्ष गंगाधर बिर्जे तसेच वडगाव शेतकरी संघटनेचेे पदाधिकारी रमाकांत बाळेकूंद्री, हणमंत बाळेकूंद्री आदींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.