अनेक दिवसांपासून हुलकावणी देत असलेला मान्सून प्रत्यक्षात बेळगाव शहरात दाखल झाला आहे. काल सायंकाळ पासून शहराला मान्सूनची चाहूल लागली होतीच आज त्याने शहरात पाऊल टाकले आहे.
यंदा मान्सून ने वेळेत हजेरी लावली नसली तरी एक आठवडे उशीर करून का होईना तो आला आहे यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आहे.
बेळगाव शहरात पाण्याची समस्या गंभीर झाली आहे, पाऊस चांगला येऊन नदी, नाले व विहिरी भरण्याची गरज आहे, कालच शेतकऱ्यांनी पावसाची भाकणूक पारंपारिक पद्धतीने केली होती तेंव्हा आता वरूण राज प्रसन्न होऊन पाण्याची समस्या दूर करेल अशी आशा निर्माण होत आहे.
पाऊस सलग आणि नियमित पडला तरच शेत शिवारे फुलणार आहेत त्यामुळे शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसला होता, पण बुधवारपासून मान्सून ने पाऊल टाकल्याने शेतकरी आपल्या शेतातील कामांमध्ये गुंतणार आहे.