मित्रांसोबत पोहायला गेलेल्या एका 18 वर्षीय युवकाचा स्विमिंग पूल मध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली आहे.राहुल कटबळळी (वय 18)रा. चंदनहोसुर असे होनीयाळ मधील स्विमिंग पूल मध्ये बुडून मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.
मारिहाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुट्टी असल्याने राहुल हा आपल्या मित्रांसोबत होनीयाळ जवळील एका फार्म मधील स्विमिंग पूल मध्ये पोहायला गेला होता त्यावेळी त्याचा बुडून मृत्यू झाला आहे.
गीतिका भडांगे आणि सुजाता भरमनी या दोघी स्विमिंग पुलाच्या मालक असून अतुल भडांगे हे स्विमिंग पूल चालवत असतात.स्विमिंग पूल चालवते वेळी जीव वाचविण्यासाठी कोणतेही साधन उपलब्ध नसून यांच्या निष्काळजीपणामुळे राहुलचा जीव गेल्याची फिर्याद मारिहाळ पोलिसांत दाखल झाली आहे.
सध्या सुट्टी असल्यानं सगळीकडे स्विमिंग पूल मध्ये गर्दी आहे अश्यात पोहायला जाणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे.