Friday, October 18, 2024

/

बेळगावच्या सुरेश अंगडींना मिळाले हे खाते..

 belgaum

गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात बेळगावचे खासदार सुरेश अंगडी यांनी केंद्रीय राज्य मंत्री या दर्जाच्या मंत्री पदाची शपथ घेतल्या नंतर त्यांना कोणतं खाते मिळेल याकडे बेळगावकर जनतेचं लक्ष लागलं होतं.शुक्रवारी काल शपथ घेतलेल्या सर्व मंत्र्यांना खाते वाटप करण्यात आले आहे.

अंगडी यांना रेल्वे या खात्याचे राज्य मंत्री पद मिळाले असून पियुष गोयल हे या खात्याचे कॅबिनेट मंत्री आहेत.रेल्वे खात्याला एक कॅबिनेट मंत्री तर दोन राज्य मंत्री आहेत त्यापैकी एक राज्य मंत्री पद अंगडी यांना मिळालं आहे

Suresh angadi
.गेल्या 25 वर्षांपूर्वी भाजपचे तत्कालीन खासदार बाबगौडा पाटील यांना केंद्रीय ग्रामीण विकास राज्य मंत्री पद मिळालं होतं आता अंगडी याना रेल्वे खात्याचे राज्य मंत्री पद मिळालं आहे.

कर्नाटकचे आणखी एक कॅबिनेट मंत्री सदानंद गौडा यांना रासायनिक खते मंत्रालय तर प्रहलाद जोशी यांना कोळसा खनिज आणि संसदीय कामकाज हे मोठं खाते मिळालं आहे. शिवसेनेचे एकमेव मंत्री अरविंद सावंत यांना अवजड उद्योग आणि पब्लिक इंटरप्रायजेस हे खात मिळालं आहे.

अमित शहा यांना गृहमंत्री पद देण्यात आल्याचे जाहीर केले आहे. तर राजनाथ सिंह यांना संरक्षण मंत्री म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

सदानंद गौडा – खत आणि रसायन मंत्री
निर्मला सितारामन – अर्थमंत्री

नितीन गडकरी – वाहतूक दळणवळण मंत्रालय

राम विलास पासवान – ग्राहक मंत्रालय
नरेंद्र सिंह तोमर – कृषीमंत्री
रवी शंकर प्रसाद – कायदा व न्याय मंत्रालय, दूर संचार, तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

सुब्रमण्यम जयशंकर – परराष्ट्र मंत्रालय
स्मृती इराणी – महिला व बाल कल्याण मंत्रालय

रामविलास पासवान- ग्राहक संरक्षण मंत्रालय

थावरचंद गेहलोत – सामाजिक न्याय

रविशंकर प्रसाद – कायदा आणि माहिती व प्रसारण मंत्रालय

हरसिमरत कौर बादल – अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय

रमेश पोखरीयाल निशंक – मनुष्यबळ विकास मंत्रालय

अर्जुन मुंडा – आदिवासी विकास मंत्रालय

डॉ. हर्षवर्धन – कुटुंब कल्याण आणि आरोग्य मंत्रालय, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि भू विज्ञान विभाग

प्रकाश जावडेकर – पर्यावरण, माहिती प्रसारण

पीयुष गोयल – रेल्वे मंत्रालय, वाणिज्य मंत्रालय, उद्योग मंत्रालय

धर्मेंद्र प्रधान – पेट्रोलिअम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, स्टील मंत्रालय

मुख्तार अब्बास नक्वी – अल्पसंख्याक विकास मंत्रालय

प्रल्हाद जोशी – संसदीय कामकाज तसेच कोळसा आणि खाण मंत्रालय

महेंद्र नाथ पांडे – कौशल्य विकास आणि नवोद्योजक मंत्रालय

अरविंद सावंत – अवजड उद्योग मंत्रालय

गिरीराज सिंह – पशूपालन, दुग्धविकास आणि मत्सोद्योग मंत्रालय

गजेंद्र सिंह शेखावत – जलशक्ती मंत्रालय

राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार

संतोष गंगवार – कामगार आणि रोजगार

राव इंद्रजित सिंह – सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी, तसेच नियोजन

श्रीपाद नाईक – आयुष मंत्रालय, संरक्षण राज्यमंत्री

जितेंद्र सिंह – पंतप्रधान कार्यालय, ईशान्य हिंदुस्थान विकास

किरेन रिजीजू – क्रीडा आणि युवक कल्याण

प्रल्हाद सिंह पटेल – सांस्कृतिक आणि पर्यटन

राजकुमार सिंह – ऊर्जा, अपारंपारिक ऊर्जा, कौशल्य विकास

हरदीपसिंग पुरी – गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्रालय, नागरी उड्डयन

मनसुखलाल मंडाविया – नौवहन

राज्यमंत्री

अश्विनीकुमार चौबे – आरोग्य आणि कुटुंब कल्याण

अर्जुनराम मेघवाल – संसदीय कामकाज आणि अवजड उद्योग

व्ही के सिंह – दळणवळण आणि रस्ते वाहतूक मंत्रालय

त्रिशंक पाल – समाजिक न्याय

रावसाहेब दानवे – अन्न आणि सार्वजनिक वितरण

जी. किशन रेड्डी – गृह मंत्रालय

पुरुषोत्तम रुपाला – शेती आणि शेतकरी विकास

रामदास आठवले – सामाजिक न्याय

साध्वी निरंजन ज्योती – ग्राम विकास

बाबुल सुप्रिओ – पर्यावरण वने आणि पर्यावरण बदल

संजिव कुमार बलियान – पशूपालन, दुग्ध उत्पादन आणि मत्सोद्योग

संजय धोत्रे – मनुष्यबळ विकास मंत्रालय

अनुराग टाकूर – अर्थ आणि कॉर्पोरेट अफेअर्स

सुरेश अंगडी – रेल्वे मंत्रालय

नित्यानंद राय – गृह

रतनलाल कटारिया – जलशक्ती आणि समाजिक न्याय

व्ही मुरलीधरन – परराष्ट्र, संसदीय कामकाज

रेणुका सिंग सरुता – आदिवासी विकास

सोमप्रकाश – वाणिज्य आणि उद्योग

रामेश्वर तेली – अन्नप्रक्रिया

प्रतापचंद्र सारंगी – लघु आणि मध्यम उद्योग

कैलाश चौधरी – शेती आणि शेतकरी विकास

देबश्री चौधरी – महिला आणि बालविकास

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.