शहरापासून जवळच असलेल्या मुख्यमंत्री कुमारस्वामी लेआऊट परिसरातील रस्त्यांची वाताहत झाली आहे. एका मुख्यमंत्रीच्या नावाने असलेल्या लेआऊट च्या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. त्यामुळे कुमार स्वामी यांच्या लेआऊट मधेच अशी परिस्थिती आहे तर इतर ठिकाणी काय परिस्थिती असणार? याचा विचार ज्याचा त्याने करावा.
कुमारस्वामी लेआऊट समोरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यातून प्रवास करताना नागरिकांना अडचण निर्माण होत आहे. असे असले तरी सार्वजनिक बांधकाम खात्याने हा रस्ता करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. हा रस्ता नेमका कधी होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
बॉक्साईट रोड मार्गे येणाऱ्या कुमार स्वामी लेआऊट समोरील भागात रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे ,मोठमोठे खड्डे पडल्याने छोटे मोठे अपघात घडत आहेत. त्यामुळे हा रस्ता तातडीने करावा अशी मागणी होत आहे ,एका मुख्यमंत्री असलेल्या कुमार स्वामी यांनी निर्माण केलेल्या ले आऊटची अशी परिस्थिती आहे तर इतर ठिकाणी चांगल्या सुविधा मिळणार तरी कशा? असा प्रश्न निर्माण पडत आहे.
या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते, त्यामुळे हा रस्ता दुरुस्ती करून वाहन चालक व नागरिकांची सोय करावी अशी मागणी होत आहे. दरम्यान सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने रस्त्याची डागडुजी करावी याचबरोबर रस्त्यावर भरलेल्या खड्ड्यांमध्ये माती न टाकता डांबर घालावा, नाहीतर पावसाळ्यात परिस्थितीत फार बिघाड होऊ शकतो.