बेळगावचे खासदार सुरेश अंगडी (railways mos))यांना नुकतेच रेल्वे मंत्रालयाचे राज्य मंत्रिपद मिळाले. मात्र त्यांच्या समोर रेल्वे समस्या सोडविण्याची मोठी आव्हाने उभी आहेत. बेळगावला वाढीव रेल्वे सुविधा मिळवून देण्याचे प्रमुख आव्हान त्यांच्यासमोर राहील.
त्यांच्या विभागासाठी आव्हान काय आहेत?
नवीन मंत्रिपद मिळाले असले तरी रेल्वे खात्यातील समस्यांचा डोंगर कायम आहे. त्यामुळे सुरेश अंगडी यांची चांगलीच कसरत होणार आहे. बेळगावकडे दुर्लक्ष केल्यास टीका आणि बेळगावला झुकते माप दिल्यास अडचणीही निर्माण होणार आहेत.
(फोटो: दिल्ली मुक्कामी मंत्री पदी निवड होताच भाजपचे नेते श्रीरामलू यांच्यासह अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत)
रेल्वे खाते हे आव्हानात्मक खाते आहे. 1991 मध्ये जेव्हा जाफर शरीफ रेल्वेमंत्री होते, तेव्हा कर्नाटकमध्ये अनेक योजना राबविण्यात आल्या. त्यामुळे त्यांना पुन्हा हेच मंत्रीपद देण्याची मागणी करण्यात आली होती.
आता देखील सुरेश अंगडी यांना रेल्वेखात्यातील विविध समस्यां निर्माण होऊ न देण्याचे काम करण्यावर भर दिला पाहिजे.
धारवाड कित्तुर बेळगाव रेल्वे मार्गाचे दोन पथकांनी सर्वेक्षण केले आहे. या मार्गासाठी जमीन अधिग्रहण प्रक्रिया सुरू आहे. दुपदरीकरणाला फक्त रेल्वे खात्याशी संबंधित कार्य करण्याची गरज नाही, तर जिल्ह्यासाठी केंद्र सरकारमध्ये अनेक प्रकल्पांचा बॅकअप घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.
बेळगाव शहरासाठी पॅसेंजर वाढ, लवकरात लवकर रेल्वे दुपदरीकरण, वाढीव रेल्वे उड्डाणपूल उभारणे, रेल्वे स्थानकाचा विकास या योजना प्रत्यक्षात सुरू कराव्या लागतील. अंगडी यांनी सुरू केलेले आणि बंद पडलेले वाय फाय पुन्हा सुरू करावे लागेल.