कॅन्टोन्मेंट येथील भाजी मार्केट एपीएमसीत हलवण्याचा आदेश देण्यात आल्यानंतर बैठक झाली आणि मंगळवारी कोणत्याही पद्धतीने आम्ही नवीन भाजी मार्केट चालवणारच असा इशारा एपीएमसीने दिला.
कॅन्टोन्मेंट भाजी मार्केट चालू देणार नाही असा इशाराही बैठकीद्वारे देण्यात आला यावर भाजी मार्केटमधील व्यापारी भडकले आणि त्यांनी आज भव्य मोर्चा आयोजित करून आपली बाजू मांडली आहे, कोणत्याही परिस्थितीत एपीएमसीत जाणार नाही मंगळवारी मूळ ठिकाणीच मार्केट सुरू राहील अशी भूमिका भाजी व्यापार्यांनी आणि दलाल तसेच शेतकऱ्यांनी मांडली आहे, मात्र मंगळवारी नेमके काय होणार याकडे सगळ्यांचेच लक्ष असून प्रशासनाची भूमिका काय असणार याची चिंता लागून राहिलेली आहे.
सोमवारी मार्केट दुपारच्या वेळी बंद असते तर मंगळवारी भाजी मार्केट सकाळी बंद असते त्यामुळे उद्या दुपारी एक नंतर मार्केटमध्ये गर्दी वाढणार असून तेथे भाजी च्या गाड्या सोडल्या जातील की नाही याची शक्यता कमी आहे, त्यामुळे व्यापाऱ्यांनी आपली बाजू स्पष्ट केलेली असताना आणि भाजी खरेदीसाठी लोक मोठ्या संख्येने कँटोनमेंट भाजी मार्केट येथेच येणार असल्याने नवीन मार्केटचे काय होणार हा प्रश्न गंभीर आहे.
या संदर्भात मंगळवारी दुपारनंतर चित्र स्पष्ट होणार असून त्याकडे बेळगाव वासीयांचे लक्ष लागले आहे.