वेगवेगळ्या सणात प्रत्येक देवी देवतांना वेगवेगळ्या प्रकारची आरास करताना आपण पाहिलं आहे दक्षिण काशी म्हणून ख्यात असलेल्या भगवान कपिलनाथाला फळांचा राजा असलेला आंब्याच्या आरास मध्ये सजवण्यात आले.
खास अक्षय तृतीयेच्या निमित्ताने ही सजावट करण्यात आली असून यासाठी पिकलेले 251 हापूस आंबे वापरण्यात आले आहेत.तानाजी गल्ली येथील कलाकार वसंत पाटील आणि मंदिराचे पुजारी सचिन आनंदाचे यांनी ही आरास सजवली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी वडगावची ग्राम देवता मंगाई देवीला द्राक्षांची आरास करण्यात आली होती त्या नंतर आज कपिलनाथाला आंब्याची आरास करण्यात आली आहे.
खास अक्षय तृतीये निमित्त पुणे येथील दगडूशेठ हलवाई गणपतीला 11 हजार आंब्याची आरास करण्यात येते नेमकं त्याचं धर्तीवर आम्ही कपिलनाथ भगवनाची आरास केली आहे सकाळ पासून आंब्यामधील कपिलनाथांचे हजारो भाविकांनी दर्शन घेतलं असल्याची माहिती मंदिर ट्रष्टी अभिजित चव्हाण यांनी बेळगाव live ला दिली आहे.आज सायंकाळी 6:30 वा.विशेष धूप आरती करणार असल्याचेहो त्यांनी सांगितले.