एक मे हा जसा कामगार दिन म्हणून ओळखला जातो तसाच तो काही ठिकाणी गुलमोहर दिन म्हणूनही ओळखला जातो. रणरणत्या उन्हात फुलणारी फुले असणारी गुलमोहराची झाडे पाहिली की सारेजण सुखावून जातात. आपल्या शहरात ही अशी काही ठिकाणे आहेत जिथे गुलमोहोर मोठ्या प्रमाणात फुलतो आणि ये-जा करणाऱ्या नजरा खेचून घेतो. त्यामुळे या नजरा आनंददायी आणि सुखावह होतात.
गुलमोहर हा तसा साऱ्यांनाच आवडतो. त्यामुळे त्याकडे पाहण्यासाठी कोणी सांगण्याची गरज नाही. गुलमोहराला वैज्ञानिक भाषेत डेलोनिक्स रेगिया असे म्हणतात. वैशिष्ट्यपूर्ण पाने आणि तशीच फुले यामुळे या झाडांचे एकंदर रूपच वैशिष्ट्याने भारलेले असते. इंग्रजीमध्ये या झाडाला रॉयल पॉईंसायाना किंवा फ्लॅटबॉयट असेही म्हटले जाते. हि झाडे समुद्र किनारपट्टी आणि दमट वातावरणात अधिक आढळतात.
गुलमोहर हा तसा हिंदी शब्द आहे. बंगालीमध्ये त्याला कृष्ण चुडा असे म्हणतात. केरळात ही गुलमोहराची झाडे आढळतात. ते त्यांना कालवरीपु असे म्हणतात. महाराष्ट्रात याला गुलमोहर असच म्हणतात.
पर्यावरणदृष्ट्या समतोल साधण्याचे काम ही झाडे आणि त्यावर फुलणारी फुले करतात. ख्रिस्ती बांधवांमध्ये या झाडांबद्दल एक अख्यायिका बोलली जाते. भगवान येशू यांना ज्या वेळी सुळावर चढविले गेले. त्यावेळी सुळा नजीक एक झाड होते. येशु च्या रक्ताचे थेंब त्या झाडांच्या फुलावर पडल्याने त्यांचा रंग लाल झाला. यामुळे गुलमोहर वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या कारणांनी परिचित आहे. असे म्हणले जाते. तसेच तसे पाहता गुलमोहर सर्वच ठिकाणी आढळून येतो आणि त्याला पाहण्यासाठी अनेक जण सहली काढतात. त्यामुळे गुलमोहर दिनविशेष म्हणून काही भागात साजरा केला जातो.