सिव्हिल हॉस्पिटल यंत्रणेने हॉस्पिटल आवारात गरीब रुग्णांची सोय करायचे ठरवले आहे की त्यांना लुटायचे ठरवले आहे? हा प्रश्न निर्माण होत आहे. डिलिव्हरी कक्षाच्या बाहेर होणारी खाद्यपदार्थांची विक्री करताना वाढीव दर आकारणी सुरू असल्याचे आरोप रुग्णांचे नातेवाईक करीत असून याला बिम्स यंत्रणेचा पाठींबा आहे.
5 रुपयांचा डोनेट 15 रुपये आणि चहा साठी 15 रुपये असे दर आहेत, पाण्याची बाटली सुद्धा जास्त दर देऊन खरेदी करावी लागते. हॉस्पिटल आवारात विक्री स्टॉल लावताना कमी दरात विक्री करण्याची अट आहे पण हा नियम भंग करून विक्री सुरू आहे.
या भागात अनेक गरीब रुग्ण येतात. बाहेर जाऊन खरेदी करावी लागते या कारणाने नाईलाजास्तव त्यांना येथे खरेदी करावी लागत आहे, नागरिकांची लूट सुरू आहे, याकडे लक्ष देऊन ही लूट थांबण्याची जबाबदारी असणारेच शांत का आहेत? याची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे.