कामानिमित्त,व्यवसायानिमित्त मुंबईला जाणाऱ्या व्यक्तीसाठी आनंदाची बातमी असून स्पाईस जेट कंपनी दि.२०जून पासून विमान सेवा सुरू करणार आहे.खासदार सुरेश अंगडी यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.खासदार सुरेश अंगडी सध्या दिल्लीत असून त्यांनी नागरी हवाई खात्याचे सचिव प्रदीपसिंग खरोला यांची सोमवारी भेट घेतली आणि बेळगावहून इतर ठिकाणी आणखी विमानसेवा सुरु करण्याची मागणी केली.
नंतर स्पाईस जेट कंपनीचे चेअरमन अजय सिंग यांच्याशी देखील फोनवरून चर्चा केली.यावेळी अजय सिंग यांनी दि.२० जून पासून बेळगाव मुंबई विमानसेवा सुरु करण्याची खात्री दिली.उडाण तीन योजनेअंतर्गत बेळगाव मुंबई सेवा सुरू होणार आहे.बेळगाव ते बंगलोर ही एअर इंडियाची सेवा बंद होणार असून एअर इंडिया ही सेवा हुबळीहून सुरु करणार असल्याचे सांगितले जाते.बेळगाव बंगलोर बंद करून हुबळीहून विमानसेवा एअर इंडियाने सुरु करावी यासाठी एअर इंडियांवर दबाव आणला असून या उलट खासदार सुरेश अंगडी असलेल्या सेवा दुसऱ्या विमानतळाना जात असल्या तरी काहीच पाऊल अंगडी उचलत नाहीत अशी अंगडी यांच्यावर टीका करण्यात येत आहे.