शेतीचे यांत्रिकीकरण, तरुणाईने पशुपालन व्यवसायाकडे केलेले दुर्लक्ष, वाढते शहरीकरण, विभक्त कुटुंबाची वाढती संख्या यासह विविध कारणांनी जिल्ह्यात पशु धन घटते आहे. ही वाढती चिंता असून यासंबंधी पशु खात्याने जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे. अशीच परिस्थिती राहिली तर जिल्ह्यात दुग्ध व्यवसायाला अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
जिल्ह्यात अधिक प्रमाणात निर्माण होत असलेले साखर कारखाने, सूत गिरणी आदी मोठे प्रकल्प राबविण्यासाठी मोठा खटाटोप सुरू असतो. मात्र याचा परिणाम जनावर पडतो. मागील दहा ते बारा वर्षात शेती व इतर व्यवसायाकडे तरुणांनी केले दुर्लक्ष आणि कुक्कुटपालनचा वाढता व्यवसाय. यामुळे पशुधन धोक्यात आल्याची घंटा आहे.
शहरात अन्य कोणत्याही क्षेत्रात संधी उपलब्ध करण्यासाठी तरुणांची चाललेली ओढाताण आणि शेती व्यवसायाकडे होत असलेले दुर्लक्ष याचा संपूर्ण परिणाम पशुधन घटनेमागे येतो. त्यामुळे पशुधनाची संख्या वाढवून देण्यासाठी आता जनजागृतीची गरज निर्माण झाली आहे. मागील दहा ते बारा वर्षांपूर्वी प्रत्येक कुटुंबाचा व्यवसाय हा शेती होता. त्यामुळे जोडधंदा म्हणून पशुपालन केले जात होते. आता प्रत्येक जण नोकरी व इतर व्यवसायात गुंतले असल्याने शेतीला जोड व्यवसाय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पशु व्यवसायाकडे दुर्लक्ष झाले आहे.
प्रत्येक घरपती एक जनावर अशी संकल्पना यापूर्वी होती. मात्र आता त्याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याने पशुधनाची संख्याही घटते आहे. याचा संपूर्ण परिणाम जिल्ह्याच्या दुग्धव्यवसायावर झाल्याचे दिसून येत आहे. कॉंक्रिटीकरणचे जाळे वाढत आहे. तर तसे पशुधनाची संख्या घटती आहे. त्यामुळे पशुधन वाढविण्यासाठी प्रत्येकानेच पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
यापूर्वी पशुधन मोठ्या प्रमाणात होते. त्यानंतर आता मेंढ्या व कोंबड्या या व्यवसायाकडे अनेक जण वळत आहेत. शेतीमध्ये पावर टेलर ट्रॅक्टर अशा विविध यांत्रिक साधने आल्याने बैलजोड्या कमी झाले आहेत. विभक्त कुटुंब वाढल्याने जनावरे बाळगण्याचे प्रमाण कमी झाले आहे. गाय व म्हशीच्या दुधाला दर नाही. पशुखाद्य चारा यांच्या दरात झालेली वाढ व तरुणाईने या व्यवसायाकडे फिरवलेली पाठ हे देखील त्याचे मुख्य कारणे आहेत. त्याचबरोबर शेतकरी व कुटुंबाचे शहराकडे नोकरीवर रोजगाराकडे होणारे स्थलांतर याला मुख्य कारण ठरू लागला आहे. त्यामुळे जर यापुढे पशुधन वाढवायचे असेल तर जनजागृती आणि प्रत्येकाच्या मनात त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती देण्याची गरज आहे.