Tuesday, January 7, 2025

/

मतदान बहिष्काराचा निर्णय घेताच नरमले प्रशासन

 belgaum

गावात ग्राम पंचायत कार्यालय सुरू करा अन्यथा ग्रामस्थ लोकसभा मतदाना वर बहिष्कार टाकतील असा एकमुखी निर्णय घेत वाघवडे ग्रामस्थांनी बेळगाव जिल्हा प्रशासनास निवेदन दिले होते याची दखल जिल्हा प्रशासनाने अवघ्या चोवीस तासात घेत ग्राम पंचायत कार्यालय सुरू करू असे लेखी आश्वासन दिले आहे.

बेळगाव जवळील वाघवडे ग्रामस्थांनी शनिवारी ग्राम पंचायत कार्यालय गावात सुरु करा अन्यथा मंगळवारी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालू असा इशारा दिला होता वाघवडे ग्राम पंचायत अस्तित्वात आल्यानंतर मार्कंडेय नगर येथे ग्राम पंचायत कार्यालय सुरु करण्यात आली होती त्यामुळे वाघवडे येथे देखील ग्राम पंचायत सुरू करा अशी त्यांची मागणी होती.

Waghwade

मार्कंडेय नगर हे वाघवडे पासून सहा किमी. अंतरावर आहे.वाघवड्याची लोकसंख्या आणि क्षेत्रही मोठे आहे.मार्कंडेय नगरला जाणे वाघवडे ग्रामस्थांना उलटे पडत आहे.मार्कंडेय नगर येथे ग्राम पंचायत कार्यालय झाल्यामुळे शासकीय योजना आणि इतर बाबींची माहिती मिळत नाही.यापूर्वीही ग्राम पंचायत कार्यालय वाघवडे येथे जनतेच्या सोयीसाठी करावे म्हणून मागणी करण्यात आली पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.यासाठी वाघवडे ग्रामस्थांनी आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा एकमुखी निर्णय घेऊन या संबंधी जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले होते .

निवडणुकीपूर्वी ग्राम पंचायत कार्यालय वाघवडे येथे हलविण्या संबंधी निर्णय घ्यावा अन्यथा लोकशाहीच्या उत्सवात ग्रामस्थ सहभागी होणार नाहीत असे वाघवडे ग्रामस्थांनी कळवले होते मात्र जिल्हाधिकारी विशाल आर ,जिल्हा पंचायतीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष घालून वाघवडे ग्रामस्थाना निवडणुकी नंतर गावात ग्राम पंचायत सुरू करू असे पत्र तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी यांनी दिले त्यामुळे या ग्रामस्थांनी मतदान बहिष्कार निर्णय माघारी घेतला आहे.

जिल्हा प्रशासना अधिकाऱ्यांनी  गावाला भेट दिली ग्रामस्थां सोबत चर्चा केली गावकऱ्यां सोबत झालेल्या बैठकीवेळी शेकडो ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता.या पत्राने आता वाघवडे गावाला पंचायत कार्यालय मिळणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.