मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने 101 उमेदवार उभे करण्याची जी घोषणा केली होती, ती योग्यच होती, त्याचा उद्धेश एकच होता की जो सीमाप्रश्न 63 वर्षे रेंगाळत आहे त्याकडे लक्ष वेधले जावे, आणि म्हणूनच इतक्या कमी वेळात एवढे जास्त उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेण्यात आला, हे उमेदवारी अर्ज म्हणजे लोकशाही पायदळी तुडविण्याचा आणि मराठी भाषिकांना त्यांचे अधिकार डावलण्याचा हा निषेध होय असे मत युवा समितीचे सचिव एकीकरण समितीचे उमेदवार श्रीकांत कदम यांनी व्यक्त केलं आहे. ते उमेदवार झाल्यावर सोशल मीडियावर पोस्ट टाकून त्यांनी आपली भावना व्यक्त केली आहे.
ते म्हणाले की.. तर वेळ कमी असून देखील यावर अंमलबजावणी करण्याच्या प्रयत्नात समितिनिष्ठ मावळा हिरीरीने कामाला लागला, एकतर वेळ कमी आणि किचकट कागदपत्रांची जमवाजमव, त्यात सरकारी अधिकाऱ्यांची कागदपत्रे देण्यास दिरंगाई यामुळे तर नाकी नऊ आले,त्यात महत्वाचा प्रश्न येतो तो आर्थिक, समिती काही राजकीय पक्ष नाही ज्याला फंडिंग-बिंडिंग मिळते, प्रत्येकाच्या खिशातील पै पैसा देणगी गोळा करून हे शिवधनुष्य पेलणे अवघड होते, पण आता निर्णय घेतलाय म्हणजे माघार नाहीच म्हणून सर्व अडचणी दूर लोटत स्वाभिमानी मराठी भाषिकांनी लढा जिवंत ठेवण्याचा संकल्प केला आणि 101 आकडा गाठण्याचा मनस्वी प्रयत्न केला असा दावा त्यानी केेला.
या अडचणीपुढे एक पाऊल मागे घ्यावे लागले, पण हा आपला पराभव नाही तर झेप घेण्यासाठी कधी कधी मागे यावे लागते याचे लक्षण समजावे असेही त्यांनी बोलून दाखवले आहे.
आज 50 च्या वर मावळ्यांनी लढा समर्थपणे पेलण्याची जणू ग्वाहीचं दिली आहे,,,, आणि आम्ही सदैव समितीशी बांधील आहोत हे सगळ्यांना दाखवून दिले आहे.