घरात कुणी नसलेलं पाहून भर दुपारी चोरट्यानी डल्ला मारत तब्बल साडे सतरा लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.बेळगाव शहरातील टिळकवाडी पोलीस स्थानक व्याप्तीतील हिंदू नगर भागात ही घटना घडली आहे.
मंजुनाथ भट्ट असे चोरी झालेल्या घर मालकाचे नाव असून गुरुवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे.
दिवसा ढवळ्या हा प्रकार घडल्याने या भागात भीतीचे वातावरण पसरले होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरी झाली त्यावेळी मंजुनाथ भट्ट हे बँकेत नोकरीला गेले होते तर त्यांची पत्नी बाजाराला गेली असता चोरांनी संधी साधत घरात प्रवेश करून कपाटातील 17 लाख 11 हजार किंमतीचे सोन्याचे दागिने आणि मौल्यवान वस्तू लांबवल्या आहेत.
एकीकडे पोलीस निवडणूक बंदोबस्तात व्यस्त असताना चोरट्यानी ही संधी साधत घराचे कुलूप तोडून लाखांचे दागिने लांबवले आहेत. टिळकवाडी पोलिसांनी या घटनेची नोंद करून घेतली आहे.या अगोदर देखील या पोलीस स्थानक व्याप्तीत अनेक चोऱ्या झाल्या होत्या.