वैशाख शुद्ध तिथीला दरवर्षी बेळगावात शिवजयंती चित्ररथ मिरवणुक उत्साहाने साजरी केली जाते. यंदाची चित्ररथ मिरवणूक शंभर वर्षे पूर्ण करत आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रशासनाने परवानगी देण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. त्यामुळे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने संपूर्ण शिवजयंती युवक मंडळांना एकत्र बोलावून त्यांची बैठक घेऊन प्रशासनावर दबाव आणण्याची गरज निर्माण झाली आहे.
लोकसभा निवडणूक मतदान दिनांक 23 एप्रिल रोजी संपन्न होणार आहे. तर 23 मे रोजी संपूर्ण लोकसभा निवडणुकीचे मतमोजणी होणार आहे. यावर्षी शिवचित्ररथ मिरवणूक शंभर वर्षे पूर्ण करणार आहे. त्यामुळे साऱ्यांच्याच मनात उत्साह आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. असे असताना निवडणुकीचे कारण सांगून प्रशासन परवानगी देण्यास टाळाटाळ करत आहे. चित्ररथ मिरवणूक 28 मे ला करा असे सांगण्यात येत आहे. मात्र शाळेची लगबग आणि इतर कामात पालकवर्ग अडकणार आहेत. त्यामुळे या मिरवणुकीला त्यांची अनुपस्थिती दिसणार आहे.
सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील चित्ररथ मिरवणूक वैशाख शुद्ध तिथिला करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. निवडणुकीचे कारण सांगून केवळ मराठी भाषिकांवर अन्याय करण्याचा प्रयत्न सुरू असला तरी याला चोख प्रत्युत्तर म्हणून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने पुढाकार घेऊन प्रशासनावर दबाव आणणे गरजेचे आहे.
पुणे-मुंबई पेक्षाही अधिक उत्साहाने बेळगावात शिवजयंती साजरी करण्यात येते. याशिवाय चित्ररथ मिरवणुकीत ७० ते ८० मिरवणूक मंडळ सहभाग घेतात. त्यामुळे यावर्षी होणारे चित्ररथ मिरवणूक अनेकांच्या स्मरणात राहणारे आहे.
शंभर वर्षाचा इतिहास लाभलेल्या चित्ररथ मिरवणुकीला लोकसभा निवडणुकीचे कारण सांगून प्रशासन आपली पोळी भाजून घेत नाही ना? असा प्रश्न निर्माण होत आहे त्यामुळे तिथीनुसारच चित्र मिरवणूक घ्यावी असे मत व्यक्त होत आहे. कोणत्या निवडणुकीत महावीर जयंती असो किंवा इतर कोणतेही जयंती असो त्याकाळात परवानगी देते मात्र मराठी माणसांचा कोणताही उत्सव असल्यास त्यास आडकाठी घालण्यात प्रशासन कधी कमी पडत नाही. अशा प्रकारामुळे संताप व्यक्त होत आहे. शिवजयंती हि मराठमोळ्या आणि प्रत्येकाला शिवाजी महाराजांचे दर्शन करून देणारी चित्ररथ मिरवणूक असते. अशावेळी प्रशासनाने या ठिकाणी म्हणजे मराठी माणसांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे शंभर वर्षांचा इतिहास लाभलेल्या शिवजयंतीला प्रशासन का परवानगी देत नाही? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे मध्यवर्ती शिव जयंती मंडळाने यासाठी पुढाकार घेऊन तिथीनुसारच शिवजयंती चित्ररथ मिरवणूक करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे