शिक्षण खात्याने पहिला दिलेल्या माहितीनुसार दोन विद्यार्थिनींनी दहावीत बेळगावचा झेंडा फडकवल्याचे स्पष्ट झाले होते, पण या दोघीही चौथ्या क्रमांकावर असून आता मिळालेल्या माहितीनुसार 620 गुण घेतलेले प्रीतम विद्यार्थी आणि अक्षता विद्यार्थीनीने बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात तीसरा क्रमांक पटकावला आहे.
बैलहोंगल येथील ऑक्सफर्ड इंग्रजी माध्यम शाळेचा विद्यार्थी प्रीतम चिकोप्प आणि बेळगाव येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कुल ची विद्यार्थिनी अक्षता आय चुंचनूरमठ( रा. भडकल गल्ली) अशी आता जिल्ह्यात तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. या दोघांनीही 625 पैकी 620 गुण म्हणजेच 99.20%गुण मिळवत बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात संयुक्तपणे तिसरा क्रमांक मिळवला आहे.
केतकी ताम्हणकर आणि केयुरी शानभाग या दोन विद्यार्थिनींनी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 619 गुण म्हणजेच 99.20% गुण मिळवत दहावीत जिल्ह्यात चौथा क्रमांक मिळवला आहे.