प्रकाश हुक्केरी हे बेळगावातून लढणार हा विषय गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत आहे हे खोटे असून केवळ अफवा आहे असे स्पष्टीकरण बेळगाव काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ व्ही एस साधूनावर यांनी दिल आहे.
सोमवारी सकाळी बेळगावात काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.चिकोडी लोकसभा मतदार संघात भाजपचे तिकीट माजी खासदार रमेश कत्ती यांना हुकले होते त्यानंतर हुक्केरी बेळगावातून तर कत्ती चिकोडीतून लढतील असे बोलले जात होते या चर्चेला उधाण देखील आले होते ही केवळ अफवाच असल्याचे ते म्हणाले.
भाजपचे उमेदवार सुरेश अंगडी यांनी गेल्या पंधरा वर्षात काहीच विकास कामे केली नाहीत त्यांच्या बद्दल जनतेत रोष आहे त्यामुळे मला सहानुभूती मिळत आहे असे देखील त्यांनी नमूद केलं.
शिक्षण आरोग्य आणि आर्थिक क्षेत्रात मी काम केलंय अनेकांना रोजगार दिलेत याचा नक्कीच मला फायदा होईल गेल्या 40 वर्षात केलेल्या समाज सेवेमुळे मला हाय कमांड ने तिकीट दिलंय असेही ते म्हणाले.यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी,अडिवेश इटगी,जयश्री माळगी आदी उपस्थित होते.
.