बेळगाव लोकसभा मतदारसंघात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची अबकी बार मै भी खासदार ही मोहीम जोरदार सुरू आहे. बुधवारी 13 हुन जणांनी अर्ज भरले . उत्साही आणि प्रामाणिक समिती कार्यकर्त्यांनी आपले अर्ज भरून देशाचे लक्ष सीमाप्रश्नाकडे वेधले.
मंगळवारी सर्व पूर्वतयारी करून उमेदवार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाखल झाले. आपापले अर्ज सादर करून सीमाप्रश्नाच्या लढाईत एक वेगळा मार्ग निवडण्यात आला.
राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांना लोकसभेत पाठवून मराठी माणसाची बाजू कधीच सावरली गेली नाही यामुळे आलेल्या नाराजीतून मध्यवर्ती समितीने हा निर्णय जाहीर केला आणि त्याला जनता व समिती कार्यकर्त्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे, यामुळे उद्या गुरुवारी सुद्धा अनेक अर्ज दाखल होणार आहेत. आज अर्ज भरलेल्यांमध्ये बुलंद दळवी, माजी नगरसेवक विजय पाटील, युवा समितीचे शुभम शेळके, धनंजय पाटील, पत्रकार शिवराज पाटील, पांडुरंग पट्टण,विनायक मोरे,चेतक कांबळे, महादेव मंगणाकर,गणेश दद्दीकर,उदय नाईक,अनिल हेगडे , लक्ष्मण दळवी आदींनी समावेश होता.
आता पर्यंत एकूण 33 जणांनी अर्ज दाखल केले असून बुधवारी 20 जणांनी अर्ज भरले त्यात 19 अपक्षांचा 16 समितीच्या अर्ज आहेत. गुरुवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून भाजपचे खासदार अंगडी शक्ती प्रदर्शन करून अर्ज भरणार आहेत त्यातच समितीचे जवळपास 70 हुन अधिक उमेदवार अर्ज दाखल करण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी कार्यालय गजबजलेले असू शकते.