या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने दिलेले आवाहन पन्नास टक्के पूर्ण झाले आहे 101 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा निर्णय करण्यात आला होता मात्र 50 ते 51 पर्यंत मजल जाऊ शकली मात्र हे ही नसे थोडके हे संबंधितांनी लक्षात घ्यायची गरज आहे ज्या ठिकाणी समिती नेते राष्ट्रीय पक्षांची एजंटगिरी करून लोकसभा निवडणुकीत पैसे वाटण्याचे काम करत होते आज त्याच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी स्वतः मागे राहुन तरुण कार्यकर्त्यांना पुढे केले असल्याचा आरोप होत आहे मात्र नेत्यांचे सोडून द्या तरुणांची नवीन पिढी सीमा प्रश्नात सक्रिय होऊ लागली आहे हे यावरून दिसून येत आहे .
राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांनी पैसे देऊन समितीच्या नेत्यांना उमेदवारी अर्ज भरायला लावले असा आरोप होत असताना ज्यांनी ज्यांनी अर्ज भरले त्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च केल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे हा आरोप आता मागे पडत चालला आहे राष्ट्रीय पक्षांना निवडणुकीच्या धामधुमीत मध्ये स्वतःच्या प्रचाराची भूमिका कशी राबवावी हेच कळत नसताना त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीची मते मागण्यापेक्षा शंभर उमेदवार उभे करा असे सांगणे चुकीचे आहे मात्र या प्रकारचे आरोप सर्वत्र होताना दिसत आहेत महत्त्वाचे म्हणजे त्या निवडणुकीत 50 51 उमेदवार उभे राहिल्यामुळे काही समिती नेत्यांची दुकानदारी बंद झाली असून राष्ट्रीय पक्षांनी त्यांना आता पैसे का द्यावेत असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत बेळगाव ग्रामीण भागात राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे पैसे मोठ्या प्रमाणात वाटण्यात आले आणि त्याचा फटका विधानसभा निवडणुकीत बसला आता यावेळी पैसे वाटण्याचे प्रमाण तसेच राहणार की कमी होणार अजून स्पष्ट झालेले नाही आज अर्जांची छाननी होणार आहे त्यानंतर अर्ज माघारी होणार आहे त्यानंतरच देवघेव आणि वाटपाचे काम सुरु होणार असून कुठल्या नेत्याने किती आणले आणि वाटले याचा हिशोब त्यावेळी मिळू शकणार आहे 101 उमेदवार होऊ शकले नाही तरी एक्कावन झालेत त्यामुळे या उमेदवारांना जास्तीत जास्त मते घालण्याचे काम महाराष्ट्र एकीकरण समितीनिष्ठ जनतेला करावे लागणार आहे.
सर्व समितीच्या उमेदवारांना मिळून पडणारी मते हीच सीमाभागातील मराठी माणसाची ताकद असा विचार केल्यास या उमेदवारांना जास्त मते पडणे गरजेचे आहे त्यापैकी एकही उमेदवार निवडून येणार नाही म्हणून राष्ट्रीय पक्षांना मतदान करण्यापेक्षा या उमेदवारांना मते घालून मराठी माणसाची ताकद दाखवून देण्याचे आवाहन युवा समिती व कार्यकर्ते करत आहेत.