महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना रविवारी शिवाजी उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस हार अर्पण करताना देखील बराच संघर्ष करावा लागला आहे.आचार संहितेच्या उल्लंघनेच निमित्त पुढे करत अधिकाऱ्यांनी युवा समितीच्या उमेदवारांना हार अर्पण करण्यास मज्जाव केला मात्र अधिकाऱ्यांना न जुमानता उपस्थित उमेदवारांनी छत्रपतींची पूजा केली.
लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने 45 उमेदवार उभे केले आहेत त्यापैकी युवा समितीचे सात उमेदवार आहेत या सात अन्य तिघे अश्या नऊ उमेदवारांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून महा मानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीस हार अर्पण करून आशीर्वाद घेण्याचे ठरवले होते त्यानुसार सकाळी शिवाजी उद्यानात महाराजांच्या मूर्तीस हार अर्पण करून अभिवादन करण्यास गेले होते.
उमेदवारांना हार अर्पण करू नका परवानगी दाखवा अशी विचारणा निवडणूक अधिकाऱ्यांनी केली त्यावेळी आपण काल निवडणूक अधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली होती मात्र केवळ हार अर्पण करून पूजा करण्यास परवानगीची गरज नसल्याचे सांगण्यात आले त्यामुळे आता तुम्ही इथं आणून परवानगी द्या मात्र आम्ही छत्रपती च्या मूर्तीस हार अर्पण करणारच हवं तर गुन्हा दाखल करा अशी भूमिका घेताच त्या अधिकाऱ्यांना निरुत्तर व्हावे लागले अन शेवटी समितीच्या उमेदवारांनी छत्रपतींचे पूजन केलं.
शिवाजी उद्यानात माजी नगरसेवक विनायक गुंजटकर,युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके,धनंजय पाटील,श्रीकांत कदम,विनायक मोरे,सचिन केळवेकर,मारुती चौगले, नितीन आनंदाचे हे उमेदवार उपस्थित होते.यावेळी उमेदवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला.