साऱ्या देशात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असताना सर्व नागरिकांनी मतदान करावे यासाठी सरकारी यंत्रणा व निवडणूक आयोग वेगवेगळे फंडे आजमावताना दिसत आहेत. सध्या निवडणूक आयोगाने बसच्या तिकिटावरही मतदान करण्याचे आवाहन आणि जागृती सुरू केल्याचे दिसून येत आहे
बेळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बसच्या तिकिटावर लोकसभेसाठी प्रत्येकाने मतदान करावे, असे आवाहन केले आहे. त्यामुळे आता नागरिकांतून याबाबत जागृती होण्यास मदत मिळत आहे. याचा विचार प्रत्येकाने करावा असे आवाहन केएसआरटीसी तर्फे करण्यात आले आहे
बेळगाव बरोबरच संपूर्ण कर्नाटकात याबाबत जनजागृती करण्यात आली आहे. यासह विविध माध्यमातून ही प्रक्रिया सुरू आहे. शाळा आणि इतर अनेक ठिकाणी मतदान करण्याची जनजागृती करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे आता यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा लागणार आहे
कर्नाटक परिवहन महामंडळानेही यासाठी आता खारीचा वाटा उचलला आहे. प्रत्येक तिकिटावर मतदानाबद्दल जागृतीपर संदेश लिहिण्यात आले आहे. त्यामुळे आता प्रत्येक तिकिटावरही निवडणुक जागृतीचाच फंडा दिसून येत आहे