बेळगाव शहरातील एक ऐतिहासिक वारसा असलेले कॅम्प येथील सेंट मेरीज चर्च 150 वर्षांचे झाले आहे.15 एप्रिल पासून या चर्च च्या दिडशेव्या वर्षाला सुरुवात होत आहे.
1869 मध्ये ब्रिटिश लष्कराने बिशप हाऊस च्या पाठीमागे हे चर्च बांधले होते.
या निमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत अशी माहिती कर्नल ज्ञानिकन यांनी दिली आहे.गोकाक येथील दगड, बेल्जियम येथील काचा आणि दांडेली व अळणावर भागातील लाकूड वापरून हे चर्च बांधण्यात आले. सिमेंट किंव्हा लोखंडाचा वापर केला नाही.दगडाच्या भूकटीचा वापर करून चर्च बांधण्यात आले आहे.
हे बांधकाम करण्यासाठी 9 वर्षे लागली होती, आजही हे बांधकाम भक्कम आहे. 14 एप्रिल पासून चर्च मधील कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे.