शनिवारी झालेल्या वादळी वाऱ्यात हेस्कोमचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे लाखो रुपये वीज आणि खांब पडून पाण्यात गेले असले तरी हेस्कोमचे काम मात्र सुरूच आहे. त्यामुळे हे काम कधी संपणार आणि विज समस्येतून नागरिकांना कधी सुटका मिळणार याकडेच साऱ्यांची नजर आहे.
शनिवार दिनांक 27 रोजी दुपारी अडीचच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या वार्यात शहरातील व उपनगरातील झाडे विद्युत खांबावर व तारांवर पडून हेस्कोमचे मोठे नुकसान झाले आहे. याच दिवशी नंदीहळ्ळी येथे लाईनमनचा ही विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. शहर परिसरात झालेली पडझड ही इस्कॉनच्या लक्षात आली असली तरी त्याच्या दुरुस्तीसाठी आता चांगलीच कसरत करावी लागत आहे.
(सदर file फोटो आहे चार दिवसा पूर्वी झालेल्या पावसाने वाऱ्याने तारेवर कोसळले ले झाड)
मागील चार ते पाच दिवसापासून या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे हे काम संपता संपेना असे दिसू लागले आहे. त्यामुळे हेस्कोमचे सारेच कर्मचारी आणि अधिकारी दुरुस्तीच्या कामात व्यस्त असल्याचे सांगण्यात येत आहे.
पडलेल्या खांब व तारामुळे अनेक भागात वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. मात्र तात्पुरता डागडुजी करून हा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला असला तरी अजूनही काही भागात दुरुस्तीचे काम सुरू असल्याने विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. ही दुरुस्ती कधी संपणार असा सवाल उपस्थित होत आहे. विशेष करून वनखात्याने याबाबतची गांभीर्याने दखल घेतली नसल्याचे समजते वादळी वाऱ्यात पूर्वीच वनखात्याने धोकादायक झाडे व त्यांच्या फांद्या हटविणे गरजेचे होते. मात्र तसे न करता वादळी वाऱ्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आतातरी वनखाते शहाणे होईल का असा प्रश्न निर्माण झाला आहे.