केतकी ताम्हणकर आणि
केयुरी शानभाग या दोन विद्यार्थिनींनी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात दहावीत चौथा क्रमांक मिळवून बेळगाव शहराचे नाव रोशन केले आहे.
दोन्ही विद्यार्थिनी या एम व्ही हेरवाडकर शाळेच्या विद्यार्थिनी असून त्या बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात चौथा आल्या आहेत. त्यांना 625 पैकी समान 619 गुण पडले आहेत. म्हणजेच 99.04 टक्के पडले आहेत.
यंदा बारावीत प्रथम आलेला सईश मेंडके हा सुद्धा पूर्वी हेरवाडकर शाळेचाच विद्यार्थी होता.
या दोघीनी आपण इंजिनीयर होणार आहोत असे बेळगाव live ला बोलताना सांगितले आहे.
या दोन मुलींनी हेरवाड कर शाळेचे नाव उजवल केले आहे.